विधानपरिषदेच्या १२ सदस्यासाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत जोर धरू लागला. संपुर्ण उमेदवार निवडून प्रचारासाठी नवनवीन शक्कल लढविली जात आहे. शिक्षक मतदारांना आपली भुरळ घालण्यासाठी वेगवेगळ्या आमिशांचे प्रलोभने देतांना प्रचार यंत्रणा दिसुन येत आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांनी तर आपले संपुर्ण कुटुंबच प्रचार करण्यासाठी कामाला लावले असुन आपल्या मुला मुलींना दुरध्वनी वरून शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधुन त्यांच्या खुशालीची चौकशी करीत आपल्या वडिलांसाठी मताची भिक मागतांना दिसुन येत आहे. परंतु मतदार हे सुशिक्षित असल्याने त्यांना आश्वासनाची भुरळ घालने आता कठीन आहे.
या प्रचार यंत्रणेचे अनेक ओडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामधिल शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दुरध्वनी वरुन संवाद साधनाऱ्या मुला, मुलींना मात्र आपल्या निष्क्रिय वडिलांचा होत असलेला अपमाण सहन करावा लागत आहे.तर हेच ओडियो रेकॉर्डिंग सोशल मिडीयावर विनोदी भाग म्हणून पाहिले जात आहे. यातुन होणारा विनोद मात्र त्यांच्या कार्याची प्रचीती करून देत आहे.